Friday, 20 May 2011

एक रुपयाचा विचार करणार मन
आता हजार रुपयेही उडवु लागलय
छोट्या दुकानात घुटमळणार् पाऊल
आता ए.सी शोरूम कडे वळु लागलय्...
कारण
आता माझ standard वाढु लागलय...

पाणीपुरीचा आस्वाद घेणार मन
आता McDonald's चा pizza खाऊ लागलय्
कसाटा खाण्याऱ्या जीभेवर हल्ली
महागड Ice-cream विरघळु लागलय...
कारण
आता माझ standard वाढु लागलय...

"वन रूम kitchen"मध्ये राहणार मन
आता प्रशस्त flatसाठी धडपडु लागलय्
लोकलच्या गर्दित धक्का खाता खाता
आता Mercedes-Benz मधुन स्वारी करु लागलय्...
कारण
आता माझ standard वाढु लागलय...

जे मिळेल त्यात समाधान् मानणार मन
आता थोडं choosy बनु लागलय
स्वप्नात बघितलेल्या दुनियेला खऱ्याआर्थाने
आता प्रत्यक्षाच स्वरुप् येऊ लागलाय्...
कारण
आता माझ standard वाढु लागलय...

तसं तर् गरीबी आणि श्रीमंतीने
समानतेनेच घरी पाणी भरलय...
पण श्रीमंतिपेक्षा गरिबीमुळे जीवनाला
कसं जगायच हे कळलयं...
म्हनुणच ...
कदाचित मनाप्रमाणे अंगातलही बळ वाढलय...
कारण ...
आता माझ standard वाढु लागलय..


आयुष्य जास्त सुंदर वाटत
गाडी मिरवणाऱ्या श्रीमंत पेक्षा
झोपडीत हसणाऱ्या गरीबाकडे पहावं
आयुष्य
जास्त सुंदर वाटत....

नशिबाची चाकरी करण्यापेक्षा
कर्तृत्वाला
आपल्या हाताखाली बाळगाव
आयुष्य जास्त सुंदर बनत...

भविष्याचे
चित्र काढण्यापेक्षा
वर्तमानातल पूर्ण कराव
भूतकालातल रंगवून
पहावं
आयुष्य जास्त सुंदर वाटत....

कायमच मागण्या
करण्यापेक्षा
कधीतरी काहीतरी देऊन पहावं
आयुष्य जास्त सुंदर
वाटत.....

हरल्यावर एकटेच पश्चात्ताप करण्यापेक्षा
मित्राच्या
खांद्यावर रडून पहावं
आयुष्य नक्कीच सुंदर वाटत...

चारचौघात
एकट बसण्यापेक्षा
कधी कधी समुद्रकिनाऱ्यावर आठवणींना घेऊन बसावं
आयुष्य
जास्त सुंदर वाटत...

आपल्याला कोण हवंय यापेक्षा
आपण
कोणाला हवंय हे सुद्धा कधीतरी पहावं
आयुष्य जास्त सुंदर वाटत....

आकाशातले
तारे कधीच मोजून होत नाहीत
माणसाच्या गरजा कधीच संपत नाहीत
शक्य
तेवढे तारे मोजून समाधानी रहावं
आयुष्य जास्त सुंदर
वाटत..... 

मल्हारी कुटमुलगे